NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

भाजपच्या एका गटाची विखे पाटलांना धोबीपछाड; थोरातांच्या साथीने..

0

अहमदनगर/एनजीएन नेटवर्क

राज्याचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता आहे. यावेळी मात्र विखे पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कोल्हे गटाने दंड थोपाटले होते. ऐनवेळी कोल्हे गटाने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आणि परीवर्तन मंडळाच्या माध्यमातून विखेंविरोधात रान पेटवले होते. त्याचा परीणाम असा झाला की 19 पैकी 18 जागा मतदारांनी कोल्हे थोरात गटाच्या पारड्यात टाकल्या आहेत.

कोपरगाव मतदारसंघात असताना गणेशनगर साखर कारखान्यावर स्व. शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. मात्र, नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. कोल्हे यांनी विधानसभेच्या पराभवाचा गणेशनगर साखर कारखान्यात वचपा काढल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.