मुंबई/एनजीएन नेटवर्क
येत्या 22 जुलैला फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनसाठी तयारी सुरू होती. मात्र, त्याचवेळी पक्षाकडून महत्त्वाचा आदेशवजा इशारा आला आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
वाढदिवशी होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी दिली.