नाशिक/एनजीएन नेटवर्क
शिवसेना ठाकरे गटाला त्यांचेच आमदार, खासदार पक्ष सोडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. आगामी काळात उद्धव ठाकरेंना आणखी झटके बसणार असल्याचा ठाम दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला. ठाकरे यांच्याकडे केवळ सकाळचा भोंगा शिल्लक राहील, अशी खिल्लीही महाजन यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उडवली.
भाजपच्या जनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी येथे गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि प्रदीप पेशकर, जेष्ठ नेते विजय साने, महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस जगन पाटील, सरचिटणीस सुनील केदार, शहर उपाध्यक्ष कुणाल वाघ, ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव,प्रफुल संचेती, नाशिक महानगरपालिका आघाडी अध्यक्ष शशिकांत शेट्टी, निमाचे स्टार्टअप कमिटीचे श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
उठावाला अजित पवार देखील जबाबदार
महाजन म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना निधीच दिला नाही. त्यामुळेच शिवसेनेत खरा उठाव झाला. शिवसेनेतील उठावाला जितके उध्दव ठाकरे जबाबदार, तितकेच अजित पवार हे देखील जबाबदार असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. मोदी सरकारने नऊ वर्षात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह विविध घटकांसाठी घेतलेले निर्णय, राबविलेल्या योजनांची माहिती महाजन यांनी संमेलनात दिली.
तीन दिवसांत नवे महापालिका आयुक्त
आयुक्तांची बदली होऊन तीन आठवडे उलटत असताना अद्याप पूर्णवेळ आयुक्तांनी नेमणूक न झाल्यामुळे महानगरपालिकेची अनेक महत्वाची कामे ठप्प झाली आहेत. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी दोन ते तीन दिवसात नाशिक महापालिकेला नवीन आयुक्त मिळणार असल्याचे सांगितले. तसेच नाशिकला नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्तीही होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकपर भाषणात शशिकांत शेट्टी यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत नाशिक महानगर चे अध्यक्ष गिरीश पालवे यांनी केले तर सूत्रसंचालन पवन भगूरकर यांनी केले जितेंद्र चोरडिया यांनी उपस्थितांचे आमचे आभार मानले यावेळी कार्यक्रमास आशिष नहार, सतीश पाटील ,सुनील देसाई, राजेश दराडे,रामहरी संभेराव गौतम हिरण , सुरज राठी . राघवेंद्र जोशी, प्रतीक नांदुर्डीकर, जितेंद्र चोरडिया, कैलास पाटील, शरद निकम, गिरीश जोशी, तुषार जोशी, रोहिणी नायडू , मंजुषा दराडे, रश्मी बेंडाले, उदय पाटील, करूनेश पाठक, गजानन भुसारी, आनंद गौड, विजय कुकरेजा, प्रकाश काडीले, परेश बोगाणी, रवी जैन, मनीष रघुवंशी, वसंत उशिर, अमोल गांगुर्डे,राजेश नंदवानी, गोविंद शर्मा, आमोद सहाणे, दिनेश भोसले, विनोद बिरारी, प्रमोद कळसकर, नितीन देशपांडे, विद्या खरात, सतीश बोरा, कीर्ती बोरा, गोविंद शिंदे, किशोर अंकाईकर, श्याम लीलारमाणी, उमेश राठोड, राजेंद्र कासट आदीसह पाचशेहून अधिक व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.