NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

भाजप आमदारांच्या हाती ‘मार्कशीट’ ठेवणार; पर्याय देण्यावरही विचार..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप सर्व आमदारांना थेट त्यांचे रिपोर्ट कार्डच देणार आहे. जे आमदार कच्चे आहेत, त्यांची कान उघाडणी केली जाणार आहे. तसेच जे आमदार कच्चे आहेत, त्यांच्या मतदारसंघात पर्याय देण्यावरही भाजपकडून विचार केला जात आहे. त्यामुळे ‘ढ’ आमदारांना भाजपकडून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.  राज्यातील 145 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप कामाला लागली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे आमदार मतदारसंघात जाऊन तेथील नागरिकांची विचारपूस करणार आहेत. मतदारसंघात जाऊन पाहणी करणार आहेत. मात्र, असं असतानाच भाजपने सर्व आमदारांना येत्या 18 ऑगस्ट रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  या बैठकीत भाजप 106 आमदारांच्या हाती त्यांची ‘मार्कशीट’ ठेवणार आहे. कोणत्या आमदाराची कशी कामगिरी कशी आहे? प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील सर्वे काय म्हणतो यावरही चर्चा होणार आहे. कोण कुठे कमी तर कोण कुठे मागे, हे यातून दिसणार आहे. आमदारांच्या 4 वर्षातील कारकिर्दीची ही मार्कलिस्ट तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘त्यांच्या’ साठी रेड ॲलर्ट

या बैठकीत अनेक भाजप आमदारांची कानउघाडणी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मार्कशीट हाती दिल्यानंतर नापास होणाऱ्या किंवा काठावर पास होणाऱ्या आमदारांसाठी भाजपचा रेड ॲलर्ट जारी केला जाणार आहे. परिस्थिती न सुधारल्यास पर्यायी उमेदवारांनाही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.