नाशिक/एनजीएन नेटवर्क
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे ‘लोकसभा महाविजय अभियान’ अंतर्गत उद्या (दि. 25) नाशिक दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. बावनकुळे हे लोकसभा विजय अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्या अंतर्गत या दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचे जाधव यांनी सांगितले.