NGN News
Latest Marathi News

प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप; भाजप नाशिकतर्फे ‘जोडे मारो’ 

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर केलेल्या गंभीर लैंगिक शोषण, ड्रग्ज पार्टी आणि मानवी तस्करीशी संबंधित आरोपांच्या निषेधार्थ, भारतीय जनता पक्ष नाशिक महानगर जिल्ह्या तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

     नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनिल केदार यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा येथे पार पडले. प्रांजल खेवलकर यांच्या प्रतीमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. खेवलकरांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडीओ, 1497 फोटो, असे एकूण 1779 फोटो-व्हिडीओ आहेत. हे सर्व फोटो अतिशय अश्लील, मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडीओ आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.”महिलांची मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापन होऊन चौकशीची आवश्यकता आहे. आरोपीकडून 28 वेळा रुम बुक करुन मुलींना बोलावण्यात आलं होतं. या मागचा हेतू हा केवळ संघटीत नेटवर्कचा तपास व्हावा.”आंदोलनादरम्यान “प्रांजल खेवलकर हाय हाय”, “महिलांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा खपवून घेतला जाणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या.प्रांजल खेवलकर यांना तात्काळ अटक करून गुन्हेगारी स्वरूपाच्या या प्रकरणात SIT मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केली.

यावेळी नाना शिलेदार सुनील देसाई अमित घुगे, रोहिणी नायडू,  स्वाती भामरे, भारती माळी, संगीता जाधव, अनिता भामरे, मंजुषा लोहगावकर, तुळसा मरसाळे, गणेश कांबळे, हेमंत शुक्ल, वसंत उशिर, सचिन मोरे, राहुल कुलकर्णी, नारायण जाधव, वैभव महाले, व्यंकटेश मोरे, हर्षद जाधव, बापू डापसे, प्रशांत वाघ, प्रेम पाटील, स्वराज ताजनपुरे, चित्रेश वस्पटे, गीता वाघमारे, रोहिणी दळवी, माधुरी पढार, शालिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, भाजपा नाशिक महानगराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments are closed.