NGN News
Latest Marathi News

राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

  • वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राहुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील स्थानिक आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सकाळी अचानक छातीमध्ये दु:ख असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आ. कर्डिले हे आजारी देखील होते. राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कर्डिले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

Comments are closed.