नाशिक/एनजीएन नेटवर्क
क्रांतिवीर वसंतराव नाईक क्रांती सेना महाराष्ट्र राज्य न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनानिमित्त भाजपचे नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे यांना वंजारी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक दत्तू बोडके बी के नागरे सर (अध्यक्ष आयोजन समिती) रंगनाथ दरगुडे बाळासाहेब घुगे, श्याम उगले ,धनंजय बोडके, प्रकाश चकोर ,मारुती इलग ,आदिनाथ नागरगोजे ,विलास सर ,रोहिदास आव्हाड आदींनी त्यांना हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल व त्यांना सन्मानित केल्याबद्दल गिरीश पालवे यांचे तसेच समस्त वंजारी समाजाने त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमास व्ही एन नाईक एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उद्योजक बाळासाहेब पालवे, उद्योजक बुधाजी पानसरे उपस्थित होते.