“धन्यवाद देवाभाऊ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा भाजपच्या वतीने आंदोत्सव साजरा करण्यात आला.
अशोक स्तंभ, नाशिक येथे हा आनंदोत्सव पार पडला. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयानंतर नाशिक भाजपने “धन्यवाद देवाभाऊ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
मंत्रिमंडळ उपसमिती आणि जरांगे पाटील यांच्यात झालेल्या फलदायी चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने मराठा समाजात आनंदाची लाट उसळली आहे. या आंदोत्सवाला भाजपा महानगर व जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस साहेबांचे मन:पूर्वक आभार मानले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने दाखवलेली सकारात्मक भूमिका आणि समाजाच्या भावनांना न्याय देणारा निर्णय हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून या निर्णयामुळे मराठा बांधवांचे भविष्य सुरक्षित झाले आहे अशी भावना या वेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवजी,जय भवानी,भारत माता की जय, एक मराठा लाख मराठा धन्यवाद देवा भाऊ अशा घोषणा देत आंदोत्सवाचा समारोप केला.
यामध्ये भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नेते महेश हिरे, सुरेश पाटील, सागर शेलार, स्वाती भामरे, सचिन मोरे, जितेंद्र चोरडिया, विकास एखंडे, उत्तम उगले, रामहरी सांभेराव, दिगंबर धुमाळ, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, अनिता भामरे, प्रवीण पाटील, रुपेश पाटील, सिद्धेश खैरनार, त्र्यंबक कोंबडे, राजीव भामरे, प्रेम पाटील, रोहन कानकाटे, पवन पाटील, महेश भामरे, अनिता भामरे, कमलेश पिंगळे, नीलेश जोशी, अमोल पवार, समीर व्यवहारे आणि ह्यासह अनेक भाजपा आणि मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.