NGN News
Latest Marathi News

नाशिकमध्ये पक्ष विरोधात काम करणाऱ्यांना भाजपकडून बाहेरचा रस्ता

  • महानगर अध्यक्ष सुनील केदार यांची माहिती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भाजप पक्षश्रेष्ठींच्या स्पष्ट निर्देशानुसार नाशिक महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

  केदार म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये वैयक्तिक हितापेक्षा संघटन आणि पक्षाचे हित सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणे किंवा पक्षशिस्त मोडणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. ही कारवाई म्हणजे भविष्यातील निवडणुकांमध्ये शिस्त, एकजूट आणि संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी उचललेले ठोस पाऊल आहे.

            हकालपट्टी झालेल्या व्यक्ती खालीलप्रमाणे :

हकालपट्टी झालेल्यांमध्ये कमलेश बोडके, अमित घुगे, सतिश सोनवणे, पुनम सोनवणे, रुची कुंभारकर, अशोक मुर्तडक, सुनिता पिंगळे, शशिकांत जाधव, मिरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपुत, गणेश मोरे, स्मिता बोडके, योगीता राऊत, अनंत औटे, ॲड.मिलींद मोरे, राजश्री जाधव, चंचल साबळे, यमुना घुगे, बाळासाहेब घुगे, शिला भागवत, शंकर विधाते, प्रेम पाटील, वंदना मनचंदा, रत्ना सातभाई, यमुना वराडे, संजय गायकवाड, ऋषिकेश शिरसाठ, गिता वाघमारे, गुलाब माळी, सविता गायकर, नंदिनी जाधव, कन्हैया साळवे, तुळशी मरसाळे, तुषार सोळुंखे, दिलीप दातीर, शिला भागवत, तुळशिराम भागवत, सागर  देशमुख, सोनाली नवले, एकनाथ नवले यांचा समावेश आहे.

Comments are closed.