शिवसेनेचे चार, शिवसेना उबाठाचे दोघे तर राष्ट्रवादीचा एक सदस्य
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेची अत्यंत महत्वाची मानली जाणाऱ्या स्थायी समितीवर आज संख्याबळानुसार सदस्य नियुक्त करण्यात आले. त्यानुसार सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचे नऊ सदस्य समितीवर नियुक्त करण्यात आले. निवडणुकीत २६ जागा प्राप्त करणाऱ्या शिवसेनेचे चार सदस्य समितीवर नियुक्त झालेत. शिवसेना उबाठाच्या वाटेला दोन तर राष्ट्रवादीला एक सदस्यत्व वाटेला आले.
महापालिकेची विशेष सभा महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त मनीषा खात्री यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी विविध पक्षीय सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महापौरांनी जाहीर केल्याप्रमाणे स्थायी समितीतील बलाबल असे :
भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे , डॉ. दिपाली कुलकर्णी , आदिती पांडे , इंदुबाई खेताडे , सरिता सोनवणे , जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप
शिवसेना : मयुरी पवार, किरण दराडे , राहुल दिवे , रंजना बोराडे
शिवसेना ( उबाठा ) : भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर
राष्ट्रवादी कॉंग्रेस : मुकेश शहाणे
Comments are closed.