नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणे नगर येथे मॅडम ग्रेस पिंटो यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. मंजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभू प्रार्थनेने झाली. त्यानंतर सौ. शीतल चिंचोळीकर यांनी बायबल वाचन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर प्रार्थना गीत सादर केले, तर प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचे गीत गाऊन कार्यक्रमात आनंदाची भर घातली.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दोरखेच खेळात उत्स्फूर्त सहभाग घेत टीमस्पिरिटचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
हा संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. मंजू पाटील, विभागप्रमुख सौ. शीतल चिंचोळीकर आणि सौ. भाग्यश्री मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
Comments are closed.