नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे संस्थेच्या संचालिका मॅडम डॉक्टर ग्रेस पिंटो यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विशेष सभेचे सुत्रसंचलन आर्या , काव्या ,सिमरन या विद्यार्थिनीनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने व बायबल मधील वचनाचे पठन करून झाली.सातवीच्या विद्यार्थिनीनी प्रार्थना गीत सादर केले, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी जन्मदिन गीत सादर केले व विविध उपक्रमामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील मिस, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.