- जिजाऊ महिला सेवाभावी संस्था- जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांचा उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध बचत गटांतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी गटसंघटिकांनी राष्ट्रभक्तीवर आधारित विविध विषयांवर विचार मांडले. तस्मिना शेख यांनी वक्तृत्व, मनीषा गायकवाड यांनी एकता, वैशाली व्याळीज यांनी त्याग, शोभा नायक यांनी नेतृत्व, उज्वला महाले यांनी देशप्रेम, मंजू साध यांनी स्वातंत्र्य तर संगीता मोटमल यांनी संघर्ष या विषयांवर प्रेरणादायी मते व्यक्त केली.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते यांनी महिलांना मार्गदर्शन करत बचत गट ही नेतृत्व घडवणारी चळवळ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना हळदी-कुंकू व सौभाग्यवाण देण्यात आले. व्यवस्थापक शीतल महाजन, समन्वयक दिपाली मुकणे व शीतल बागुल यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
Comments are closed.