सोमवारी सकाळी घडली दुर्घटना; अपघातस्थळी अक्षरशः रक्तमांसाचा सडा
सटाणा : श्रीकांत रौंदळ
शहरातून जाणाऱ्या सटाणा- ताहाराबाद रस्त्यावर वनोली फाट्याजवळ एसटी बस आणि मोटर सायकल यांचा भीषण अपघात होवून त्यात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दरम्यान, मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एम एच 14 एल एक्स८८४९ क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची नंदुरबार-वसई ( क्रमांक एम एच 14 एल एक्स८८४९) ही बस ताहाराबादकडून सटाणा येथे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने एसटी बसला जबरदस्त धडक दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील गोविंद काळू पवार, विकी माळी, रोशन माळी या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की अपघात स्थळी अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडला होता.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत. अपघातात मयत झालेले तरुण हे सटाणा – ताहाराबाद रस्त्यावरील सुक्कड नाला मधील रहिवाशी असल्याचे समजले आहे.
Comments are closed.