NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बडे सेलिब्रिटी ‘ईडी’ च्या रडारवर..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

बहुचर्चित महादेव बेटिंग ॲप संबंधीत माहिती गोळी करण्यासाठी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अंडरवरर्ल्ड बॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊसला पैसा पुरवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शुक्रवारी देखील ईडीने मोठी छापेमारी केली आहे. ईडीने मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापेमारी केली आहे. मुंबईत कुरेशी प्रॉडक्शन हाऊसशी सबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कुरेशी प्रॉडक्शन हाऊस बॉलिवूडमधील मोठे प्रॉडक्शन हाऊस आहे.

 अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात देखील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे. ईडीने पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. अंधेरी येथील अन्य ठिकाणी देखील सध्या छापेमारी सुरु आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे.

या सेलिब्रिटींची नावे समोर

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे देखील समोर आले आहेत. यामध्ये रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत बरुचा, मलायका अरोरा, नोरा फतेही, रणबीर कपूर.. यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.