मुंबई/एनजीएन नेटवर्क
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मेघा धाडे हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपात प्रवेश केला. यावेळेस भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या. इस्ट मज्जा नावाच्या इन्साग्राम पेजने मेघाचा भाजपात प्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअऱ केला आहे.
‘बिग बॉस मराठी’चे पहिले पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली. मेघा घाडगे ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसते.. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते.