येवला/एनजीएन नेटवर्क
शहरात गेल्या वर्षी पावसळ्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ निर्माण करण्यासाठी संपूर्ण येवला शहरात स्व खर्चातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमुख्याधिकारी रोहित पगार, पालिकेचे स्वच्छता निरिक्षक सागर झावरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, माजी नगसेवक प्रवीण बनकर, सचिन शिंदे, राजेश भांडगे, निसार शेख, सुनील काबरा, संजय परदेशी, मलिक शेख, राजाभाऊ लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, निर्मला थोरात, सीमा गायकवाड, विमल शहा, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, दिपक खोकले, सुभाष गांगुर्डे, भूषण लाघवे, विकी बिवाल, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, तुषार लोणारी, संपत शिंदे, नितीन गायकवाड, भालचंद्र भुजबळ, रवी जगताप, विजय खोकले, प्रवीण पहिलवान, संतोष राऊळ, संदीप बोढरे, श्रीकांत वाकचौरे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरवर्षी पावसाळ्यात नाले व गटारी तुंबल्याने येवला शहरातील नागरिकांना व व्यापारी पेठेतील व्यापारी वर्गास पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या पावसाचे पाणी व्यापारी पेठेतील दुकांना मध्ये तसेच नागरी वस्तीत शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्या व नागरिकांना दिलासा दिला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यावर्षी छगन भुजबळ पावसाळ्याच्या पूर्वीच विशेष बैठक आयोजित करून तसेच प्रत्यक्ष पाहणी करत संपूर्ण शहरातील मुख्य नाले व गटारी स्वच्छ करण्याचे सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु नगरपालिका प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आल्याने विशेष कुमक उपलब्ध करून स्वखर्चाने आठ दिवसांत संपूर्ण शहरातील नालेसफाई व स्वच्छता करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांना छगन भुजबळ यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आज येवला शहरात मुख्य नालेसफाई व गटार स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
येत्या आठदिवसांमध्ये सर्व नागरी वस्त्या तसेच व्यापारी पेठेतील मुख्य नाले, गटारींची जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर व ५० मजुरांच्या सहायाने स्वच्छता करण्यात येणार आहे. दिलीप खैरे यांच्या विनंतीवरून मालेगाव महानगरपालिका तसेच अंदरसुल ग्रामपंचायत प्रशासनाने जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. आज पहिल्या दिवशी पारेगाव रोड, हुडको वसाहत, गंगा दरवाजा, स्टेट बँक गल्ली, पटेल मज्जीद, दारू गुत्ता, महादेव मंदिर ते फत्तेबुरुज नाका, भांडगे गल्ली, भोई गल्ली आदी परिसरातील स्वच्छतेचे कामे करण्यात आले. या प्रमाणे संपूर्ण आठदिवसांत शहराची स्वच्छता करण्यात येत आहे.