NGN News
Latest Marathi News

भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ओबीसी नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही, असा निर्धार करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यान शड्डू ठोकलेला असताना आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहेत. भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची उद्या (दि . १ ) मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम आणि मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची भूमिका याबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याची पुढे आली आहे.  

बैठकीनंतर ओबीसी नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर होणार असून, विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट यासंदर्भात हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा संदर्भ देत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Comments are closed.