मुंबई/एनजीएन नेटवर्क
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावर पाहिजे तसा काम करत नसल्याची चर्चा अनेक नेत्याकडून ऐकत आहे. विरोधी पक्षनेते नेते पद सोडण्याची माझी तयारी आहे. मला संघटनामध्ये कोणतीही जबाबदारी द्यावी अशी मागणी काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात केली. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदी रस नाही. एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष कोण होणार यावर सध्या पक्षात घमासान पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश अध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. जयंत पाटील यांना बदलवून काँग्रेस पक्षाच्या फॉर्म्युला अनुसार अध्यक्ष व्हायला पाहिजे अशी भुमिका एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे. विरोधी पक्षनेता मराठा असेल तर प्रदेश अध्यक्ष ओबीसी असला पाहिजे अशी मागणी आज भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी थेट ओबीसी नेत्यांची नावेच सांगितली आहे.
ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड, धंनजय मुंडे, सुनील तटकरे, आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर स्वतः छगन भुजबळ तयार आहे असे मत व्यक्त केले. भुजबळ यांनी भाजप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ओबीसी नेते असल्याचा दाखला ही दिला आहे. एनसीपी पक्षाने ओबीसी नेत्याला अध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
काय म्हणाले भुजबळ..?
” विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी. आमच्या पक्षात ओबीसीला जबाबदारी दिली तर आम्ही ओबीसी समाज जोडू शकतो. आमच्या पक्षात ओबीसी नेते आहेत, तटकरे आहेत मुंडे आहेत ,आव्हाड आहेत,मला दिले तर मी काम करीन.”