मुंबई/एनजीएन नेटवर्क
छगन भुजबळ यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असे भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईट मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ज्यांना तुम्ही अभद्र म्हणताय, त्यांच्या बाजूला तालमीचा पैलवान किंवा गुरूजी जाऊन बसलेत, अशा परिस्थितीत तुम्ही विरोधक म्हणून भुजबळांचा सामना कसा करणार? असा सवाल विजय वडेट्टीवार यांना विचारला गेला. त्यावर वडेट्टीवार यांनी उपरोक्त उत्तर दिले.
भुजबळांची ही भूमिका महाराष्ट्रातील ओबीसी समजाला धक्का देणारी आहे. ज्या ओबीसींसाठी ते लढत होते, ज्याप्रकारे ते सत्ताधाऱ्यांवर ओबीसींचा चेहरा म्हणून प्रहार करत होते. महाराष्ट्रातील ओबीसीची समाजाचा विश्वास त्या चेहऱ्यावर होता. तो विश्वास घातकीपणा भुजबळ यांनी केला आहे. मी विश्वासाने सांगेल की, भुजबळ यांना जनता पुन्हा निवडून देणार नाही. त्यांनी जनतेचे फसवणूक केली, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.