- एसीबी पाठोपाठ ईडीकडून देखील क्लिनचीट
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एसीबीकडून आधीच या प्रकरणात क्लिनचीट मिळालेल्या भुजबळ यांना आता ईडीकडून देखील दिलासा मिळाला आहे.
छगन भुजबळ आणि इतरांकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता. ईडने हा अर्ज मंजूर केला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथीत घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण 14 जणांची नावं होती. हा कथीत घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं, या प्रकरणात आरोप झाल्यानं छगन भुजबळ चांगले अडचणीत आले, ते दोन वर्ष तुरुंगात देखील होते. मात्र त्यानंतर त्यांना या प्रकरणात आधी एसीबीकडून दोष मुक्त करण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना ईडीने देखील दिलासा दिला आहे.
Comments are closed.