मुंबई : भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि बजाज फायनान्स ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. या दोघांनी वित्तीय सेवांसाठी भारतातील सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील वितरणात बदल करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारी करण्याचे जाहीर केले आहे.
या अनोख्या भागीदारीमुळे एअरटेलचे 370 मिलियन, 12 लाख+ भक्कम वितरण नेटवर्क आणि बजाज फायनान्सचे 27 उत्पादन श्रेणींचे वैविध्यपूर्ण समूह आणि 5,000+ शाखा आणि 70,000 फील्ड एजंट्सचे वितरण प्रभाव एकत्र येत आहेत.
एअरटेल सुरुवातीला आपल्या एअरटेल थँक्स ॲपवर बजाज फायनान्सची किरकोळ वित्तीय उत्पादने सुलभ व सुरक्षित ग्राहक अनुभवासाठी देऊ करणार आहे आणि नंतर स्टोअर्सच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे प्रदान करणार आहे. वित्तीय उत्पादने आणि सेवांमध्ये लक्षणीय वाढ करणे कंपन्यांच्या डिजिटल मालमत्तेच्या एकत्रित सामर्थ्यामुळे एअरटेल व बजाज फायनान्सला शक्य होणार आहे.
गोपाल वित्तल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले, “एअरटेल आणि बजाज फायनान्स या देशातील दोन विश्वासार्ह कंपन्या आहेत आणि कोट्यवधी भारतीयांना विविध प्रकारच्या आर्थिक गरजा असलेला पोर्टफोलिओ देऊन सबल करण्याची सामायिक दृष्टी त्यांनी ठेवलेली आहे. दोन्ही कंपन्यांची एकत्रित पोहोच, प्रमाण आणि वितरण शक्ती या भागीदारीचा पाया म्हणून काम करणार आहे व आम्हाला बाजारपेठेत सफलता गाठण्यास मदत करणार आहे. आम्ही एअरटेल फायनान्सला समूहासाठी धोरणात्मक मालमत्ता म्हणून तयार करीत आहोत आणि व्यवसायात गुंतवणूक आणि वाढ करत राहू. आज आमच्यावर 1 मिलियन पेक्षा जास्त ग्राहक विश्वास ठेवत असून एअरटेल फायनान्सला आमच्या ग्राहकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वन-स्टॉप शॉप बनविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.”
राजीव जैन, व्यवस्थापकीय संचालक, बजाज फायनान्स म्हणाले, “डेटावर आधारित क्रेडिट हमी (अंडररायटिंग) आणि वित्तीय समावेशनाच्या केंद्रस्थानी भारतातील डिजिटल परिस्थितीक व्यवस्था आहे. एअरटेल बरोबरची आमची भागीदारी सर्वसमावेशक विकासासाठी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा फायदा तर घेतेच आणि त्याचसोबत भारतातील दोन आघाडीच्या आणि सर्वात विश्वासार्ह ब्रँड्सचे कौशल्य आणि पोहोच यांचा सुद्धा संयोग साधते. एअरटेल सोबत एकत्र काम
करून आम्ही भारताचा पसंतीचा वित्तदाता बनू इच्छितो आणि दुर्गम भागातही लाखो लोकांना वित्तीय सेवांचा लाभ घेण्यास समर्थ बनवू इच्छितो. आम्ही अशा वेळी एअरटेलशी हातमिळवणी करण्यास उत्सुक आहोत जेव्हा बजाज फायनान्स एआयच्या शक्तीचा वापर करून कार्यक्षमता वाढवित आहे आणि ग्राहकांचा अनुभव वाढवित आहे.”