NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

भावली पाठोपाठ ‘भाम’ही ओव्हरफ्लो; क्षमता पावणेतीन टीमसी..

0

घोटी/राहुल सुराणा

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस असल्याने दारणाधरण समूहाच्या धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या जोरदार पावसामुळे भावली पाठोपाठ “भाम” धरणही ओसांडून वाहू लागले आहे. तालुक्यात नव्यानेच पाच वर्षांपूर्वी प्रधान मंत्री सिंचन योजनेतून बांधण्यात आलेल्या या भाम धरणाची क्षमता जवळपास पावणेतीन टीमसी असून सलग पाचव्या वर्षीही हे धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.गतवर्षीच्या तुलनेत हे धरण भरण्यास जवळपास पंधरा दिवस उशीर झाला. तरीही धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

       नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातर्गत बांधन्यात आलेल्या दारणा धरण समूहात दारणा, भावली, वाकी, भाम या धरणांच्या पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे या धरणांच्या जलसाठ्याकडे शासनाचे विशेष लक्ष लागून असते.इगतपुरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सतत सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्वच लहानमोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे.

     धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विशेषता पश्चिम पट्यात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा धरण भरल्यात जमा आहे. दहा दिवसांपूर्वीच भावली धरण भरले. त्यात आज शुक्रवारी पहाटे रोजी भाम धरणही ओव्हरफ्लो झाल्याने दारणा नदीपात्र खळखळून वाहू लागले आहे. भाम, भावली,, वाकी या नद्यांचे पाणी दारणा धरणात समाविष्ट होत असल्याने दारणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाम धरण हे इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते खोऱ्यात निर्माण झाले असून पाच वर्षांपूर्वीच या धरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही हे धरण जलदगतीने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.