भगूर/दीपक कणसे
भगूर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भगूर नागरिक सहकारी पतसंस्थेची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन शंकर करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या व संचालक मंडळ यांच्या हस्ते दीपज्वलन करून व सरस्वतीचे पूजन करून सभेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी दहा टक्के लाभांशासह पतसंस्थेच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा तसेच मागील इतिवृत्त वाचून कायम करणे,सन २०२३-२४ च्या खर्चास मंजुरी देणे यासह थकीत कर्ज प्रकरण वन टाइम सेटलमेंट करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
व्यासपीठावर चेअरमन शंकर करंजकर,व्हाईस चेअरमन पांडुरंग आंबेकर,सोसायटी संचालक बाळासाहेब गायकवाड,मंगेश बुरके,दत्ता कुवर,संजय जाधव,राजेंद्र फुलफगर,सुरेश करंजकर,राजेंद्र जाधव,शाम ढगे,प्रमोद घुमरे,संभाजी देशमुख,उमेश मोहिते,बाळासाहेब कुटे,दत्ता वालझाडे, शरद कातकाडे,संचालिका ज्योती करंजकर,मोहिनी वालझाडे,सचिव अनिल शिंदे,अविनाश राजगुरू, कामिनी साठे आदीसंचालक कर्मचारीसह रंगनाथ करंजकर,भाऊसाहेब शिरोळे,जगन्नाथ धात्रक, शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर,अंबादास आडके,बी.डी.करंजकर,ठाकरे गट शहरप्रमुख विक्रम सोनवणे,माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे,भाऊसाहेब गायकवाड,उत्तम आहेर,मधुकर कापसे, प्रताप गायकवाड,गोविंद पुरी गोस्वामी, कैलास भोर,रामकिसन करंजकर, दिनेश आर्य,प्रसाद आडके,श्याम गायकवाड,शशिकांत देशमुख,संदेश बुरके ,वीरू आहुजा,सुनिल करंजकर,दिलीप बिडवई, प्रकाश सुराणा, सुनिल करंजकर,दादासाहेब देशमुख,देविदास जाधव, मनोहर आंबेकर,रामदास करंजकर,प्रकाश गायकवाड,श्याम देशमुख,राकेश मगर,नंदु धात्रक,शिवसेना विभागप्रमुख प्रविण लकारिया,नंदू सुर्यवंशी, दिगंबर करंजकर,प्रमोद राहणे, दिपक कणसे आदीसह पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सोसायटी संचालक दत्ता कुवर यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मानले.