NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

१९ तासांत ४५१ किमी सायकलवारी; भगूरकर गणेश कुंंवर यांची कामगिरी

0

भगूर/दीपक कणसे

येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट  गणेश देविदास कुंंवर यांनी गेल्या शनिवारी (दि. २४) पुणे ते पंढरपूर आणि परत अशी ४५१ किमी ची वैयक्तिक सेल्फ सपोर्टेड पंढरपूर सायकलवारी १९ तासांत पूर्ण करून विठ्ठलाचे नामस्मरण करून नागरिकांना आरोग्याबद्दल एक आगळावेगळा संदेश दिला आहे.

कुंवर यांची ही चौथी पंढरपूर सायकल वारी होती. या अगोदर त्यांनी ऑडॅक्स क्लब फ्रान्सतर्फे २००,३००, ४००, ,६००,१००० व १२०० किलोमीटर च्या सायकल राईड पूर्ण करून मानाचा असलेला सुपर रांडोनेरींग हा किताब अकरा वेळेस पटकावलेला आहे. तसेच त्यांनी स्टँडम सायकल म्हणजे डबल सीट असलेली सायकल यावर सुद्धा तीन वेळेस सुपर रांडोने रिंग चा किताब पटकावला आहे. त्यावेळेस त्यांचे सहकारी डॉ. अनिल कानडे होते. गणेश कुंंवर हे हाफ आयर्न मॅन सुद्धा आहेत. सध्या गणेश कुंंवर हे पुणे येथे वास्तव्यास असून महिंद्रा अँड महिंद्रा स्पेअर बिजनेस युनिट  कान्हे येथे कार्यरत आहे. या सायकलवारी दरम्यान त्यांना ऊन हवा व पाऊस अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.

गणेश कुंंवर यांनी पंढरपूर सायकलवारी केल्याबद्दल त्यांचे भगूर शहरातील सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे, वृक्षमित्र तानाजी भोर,भगूर अर्बन सोसायटीचे चेअरमन शंकर करंजकर भाऊसाहेब गायकवाड पांडुरंग आंबेकर संचालक दत्ता मंगेश बुरके,शाम ढगे,प्रमोद घुमरे, संभाजी देशमुख,सुमित चव्हाण, कैलास भोर,निलेश हासे सह मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून कौतुकाची थाप पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.