** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
बागलाण तालुक्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 12000 लाभार्थी असून बायोमेट्रिक इ केवायसी च्या अटींमुळे सर्व लाभार्थी अडचणीत आले आहेत.
या योजनेमुळे संबंधित कुटुंबांना शंभर रुपयात गॅस कनेक्शन देण्यात आलेले असून प्रत्येक सिलेंडर मागे तीनशे रुपये सबसिडी व वर्षात 12 सिलेंडर अशा सवलतींचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. मात्र आता अकरा वर्षानंतर बायोमेट्रिक इ केवायसी बंधनकारक केल्याने गॅस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. इ केवायसी नसल्यास सिलेंडर देण्यास मनाई आहे. लाभार्थ्यांनी नोंदणीकृत मोबाईल वरून बुकिंग करून ओटीपी टाकल्यानंतरच गॅस बुकिंग होतो. अनेक गॅस ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले आहेत तर ऊसतोड अथवा इतर मजुरीच्या कामांमुळे स्थलांतरित लाभार्थ्यांना इ केवायसी साठी गावाकडे येणे अशक्य होते.
इ- केवायसी ची अट शिथिल करावी
लाभार्थी मृत झाल्यास वारस बदलण्यासाठी कठीण प्रक्रिया असल्याने अनेक कुटुंबे नियमांमध्ये अडकून लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाने इ केवायसी अट रद्द करावी अशी मागणी एलपीजी गॅस वितरक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राकेश घोडे यांनी केली आहे.
Comments are closed.