डांगसौंदाणे/निलेश गौतम
केंद्र सरकारच्या मोदी सरकारला नऊ पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावोगावी घर घर संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियान अंतर्गत आज डांगसौंदाणे येथे भाजपाचे बागलाण विधानसभा प्रमुख पंकज ठाकरे यांच्या उपस्थितीत या लाभार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन श्रीराम मंदिर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे होते.
लाभार्थी संवाद मेळाव्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानातून देण्यात आलेल्या ट्रॅक्टर रोटावेटर व नांगर यंत्र यावेळी आमदार बोरसे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आले. तर कृषी विभागातर्फे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्याचे वाटप करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी कृषी विभागाच्या सर्वच योजनांची सविस्तर माहिती देत उपस्थित शेतकरी वर्गाला कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी मोनाली बागुल कृषी विभागाचे मंडळ अधिकारी शांताराम भोये अरविंद मांडवडे कृषी सहाय्यक रवी कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार दिलीप बोरसे यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधताना सांगितले की गत नऊ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाची समृद्धी आली. या भागातील नेते व बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांच्या पाठ पुराव्या मुळे अनेक विकासकामे या भागात करता आली. खेडेपाडे वस्ती रस्ते व पुलांनी जोडले गेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बागलाणचा विकासाचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष भरून काढता आला आहे. या पुढील काळात सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यातील विकासाची गंगोत्री अशीच सुरू राहण्यासाठी घर घर संपर्क अभियानास सुरुवात केली आहे. या संवाद यात्रेतून जनतेच्या भावना समजून घेतल्या जात असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी शर्मा यांनी सांगितले की बागलाणच्या इतिहासात पहिल्यांदाच असा लोकप्रतिनिधी मिळाला आहे की जो कार्यकर्त्यांना सन्मान देऊन कामाची जबाबदारी देतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून जनतेच्या हिताची कामे करून घेतो यासाठी कुठलेही स्वार्थ आमदार बोरसे कधीही ठेवत नसल्याचे सांगत आमदार म्हणून कधी त्यांच्याकडे वीज आणि बँक प्रश्न कोणी शेतकरी आले तर ती जबाबदारी ती आवर्जून माझ्याकडे देत मला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी देत असल्याचे सांगितले .यावेळी बागलाण विधानसभा प्रमुख व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे यांनी या संपर्क अभियान व हर घर संवाद योजनेचे महत्त्व सांगत मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सुरू असलेली राज्यातील घौडदोड आगामी निवडणुकीत ही अशीच सुरू राहण्यासाठी पक्षाने हे संपर्क अभियान सुरू केल्याचे सांगत गरजवंताला घर देणे हे मोदी सरकारचे प्रमुख उद्दिष्टे असून प्रधानमंत्री आवास योजनेत गरिबातील गरीब असलेल्या सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वांनी आपले स्वतंत्र रेशन कार्ड करीत प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे ही त्यांनी सांगिलते
यावेळी सरपंच सिंधुबाई निकम, बुंधाटे सरपंच गुलाब ठाकरे, यांचे सह बहुसंख्य शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ बोरसे यांनी केले