NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

कर्करोग विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा ! : डॉ. निलेश वासेकर, डॉ सुदर्शन पंडित

0

नाशिक : सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा समावेश होतो. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग आहे. त्यानंतर लिम्फोमा आणि मायेलोमाचे रुग्ण आढळतात. दरवर्षी देशभरात ल्युकेमियाचे ३५,००० नवे रुग्ण, लिम्फोमाचे ३२,००० नवे रुग्ण तर मायेलोमाचे ७,००० नवे रुग्ण आढळतात आणि रक्ताच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांना रक्ताच्या कर्करोगाविषयी जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. त्याचे निदान झाल्यास त्वरित उपचार आवश्यक असतात.

ब्लड कॅन्सर च्या रुग्णांना सर्वोत्तम आणि वैयक्तिकृत कॅन्सर उपचार देण्यासाठी इंदिरा नगर, नाशिक , येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने रुग्णांसाठी रक्ताच्या संभंधित कर्करोग आणि त्यावरील उपचार  यासह नवीन अत्याधुनिक रक्त कर्करोग निदान व उपचार  सेवा सुरू केलेल्या  आहेत. 

पत्रकारांशी संवाद साधताना रक्त विकार तज्ञ् डॉ. निलेश वासेकर म्हणाले, रक्ताच्या संभंधित कर्करोगने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात वैयक्तिक आणि रुग्ण-केंद्रित काळजी प्रदान करता येते. आमचे अत्यंत कुशल हेमॅटॉ-ऑन्कोलॉजिस्ट आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार सेवा देण्यासाठी सर्वात प्रगत तंत्रे आणि तंत्रज्ञान वापरण्यास वचनबद्ध आहेत. पुढे ते म्हणाले, मागील वर्षभरात २० कर्करोग ग्रस्त रुग्णांवर यशस्वी रित्या अस्थी मज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) करण्यात आले. तसेच अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) या आजाराने ग्रस्त २५ रुग्णावर केमोथेरेपी द्वारे तर लिम्फोमा आणि मायेलोमा या आजाराने प्रभावित २५-३० रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्याच्या प्रकृती मध्ये दैनंदिन भेटी दरम्यान सुधारणा दिसून आली आहे. वर्षभरात जवळपास १०० पेक्षा जास्त बोन मॅरो प्रोसिजर करण्यात आल्या आहेत. ऍनिमिया बाधित १००० पेक्ष्या जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यासोबतच काही रुग्णांना दैनंदिन उपचाराची गरज भासत असते अशा रुग्णांना प्रत्येक वेळी रुग्णालयात दाखल न करता डे केअर बेसिस वर लवकर उपचार मिळावेत यासाठी डे केअर सुविधा द्वारे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उपचार केले जातात. यामध्ये रक्त विकाराने ग्रस्त रुग्णावर केमोथेरपी व डे केअर प्रोसिजर केल्या जातात.

या पत्रकार परिषेदत अधिक माहिती देतांना रक्त विकार तज्ञ् डॉ सुदर्शन पंडित म्हणाले कि , रक्ताच्या कर्करोगामुळे रक्तपेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. याची सुरुवात बोन मॅरोमध्ये होते, जिथे रक्ताची निर्मिती केली जाते. बोन मॅरोमधील स्टेम सेल्स परिपक्व होऊन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्समध्ये रुपांतरीत होतात. रक्ताच्या बहुतेक कर्करोगांमध्ये रक्तेपेशींच्या विकासाच्या प्रक्रियेत असाधारण प्रकारच्या रक्तपेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे अडथळा निर्माण होतो. या कर्करोगाच्या पेशी सामान्य कार्य करणाऱ्या लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणं, जंतूसंसर्गाला प्रतिकार करणं किंवा गंभीर प्रकारचा रक्तस्त्राव थांबवणं यासारख्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

कोणतंही कारण नसताना कमी झालेलं वजन, थकवा, अशक्तपणा जाणवणं किंवा धाप लागणं, चटकन जखम होणं किंवा रक्तस्त्राव होणं, लसिका गाठींचा आकार वाढणं, पोटात अस्वस्थ वाटणं, वारंवार किंवा पुन्हा-पुन्हा संसर्ग होणं, रात्री ताप येणं/ घाम येणं, हाडांमध्ये/सांध्यांमध्ये वेदना होणं, त्वचेला कंड सुटणं आणि हाडांमध्ये वेदना (बरगड्या, पाठ) इत्यादी रक्ताच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. कर्करोगाच्या प्रकारानुसार ही लक्षणं बदलू शकतात.

पांढऱ्या रक्तेपेशींची वेगाने आणि असाधारण प्रमाणात निर्मिती झाल्यास ल्युकेमिया होतो. तो सौम्य किंवा गंभीर स्वरुपाचा असू शकतो. त्याचे लिम्फोसायटिक किंवा मायेलॉगिनस असं वर्गीकरण करण्यात येतं. ल्युकेमियाचे चार ढोबळ प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं. अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल), अॅक्युट मायेलॉइड ल्युकेमिया (एएमएल), क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आणि क्रॉनिक मायेलॉइड ल्युकेमिया. ल्युकेमिया हा लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती अशा दोघांनाही होऊ शकतो. लहान मुलांना ल्युकेमियामध्ये एएलएलचं प्रमाण सर्वाधिक असतं आणि एएमएलचा दुसरा क्रमांक लागतो. एएमएल आणि सीएलएल हे प्रौढांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे ल्युकेमिया आहेत. लहान मुलांमधील तीव्र स्वरूपाचा लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया लवकर निदान झाल्यास आणि विशेष केंद्रात हेमॅटोलॉजिस्टद्वारे उपचार केल्यास 90% पूर्ण बरा होऊ शकतो.

पुढे ते म्हणाले , “हेमॅटो-ऑन्कोलॉजी सेवा अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलसाठी एक मैलाचा दगड आहे आणि ती अविरत पणे सुरू राहील ज्याचा उद्देश उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करणे आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये आम्ही आमच्या डॉक्टरांच्या टीम द्वारे सर्वसमावेशक प्रयत्नांमध्ये सर्वोत्कृष्ट रक्त कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.