NGN News
Latest Marathi News

‘बीबीएनजी’ च्या वतीने नाशकात उद्यापासून तीन दिवस फ्यूजन फेस्ट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

बीबीएनजीच्या वतीने दि. ८ ,९ आणि १० ऑगस्ट दरम्यान उद्योजकांना आणि समाज बांधवाना प्रोत्साहनासाठी फ्यूजन फेस्ट आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय ग्राहक प्रदर्शनात विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स , मशीनरी ,कपडे, ज्वेल्लरी ,पर्फ्यूम ,सणा निमित्त कलाकारी वस्तु आणि खाद्य तसेच हॉस्पिटल पोशाख इत्यादींचा समावेश आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘कॉफी विथ सावरकर’ हा कार्यक्रम आहे .सावरकरांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी तसेच प्रदर्शन बघण्याची संधीचा लाभ नाशिककरानी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने देवकी कुलकर्णी यांनी केले आहे. याप्रसंगी आकर्षक बक्षीसे तसेच राखी पौर्णिमेनिमित्त काही क्रियाकल्प तसेच पाक स्पर्धाही होणार आहेत. नाशिककरांनी सणानिमित्त आनंद लुटावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.