पुणे/एनजीएन नेटवर्क
आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतक्रिया दिली आहे.
दिल्लीत काय दडपशाही चालते हे सगळा देश बघतोय…आपल्याकडे लोकशाही आहे. आपण सगळ्यांनी याचा मान सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. तसेच माझ्याविरुद्ध कुणी ना कुणी लढणारच, त्यामुळे असे झाले तर या निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत केले पाहिजे असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.