NGN News
Latest Marathi News

बांगलादेशकडून भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी; पहिल्या टप्प्यात २०० मे.टन.. 

निर्यातदार व शेतकरी संघटनांकडून अधिक प्रमाण वाढवण्याची मागणी

लासलगाव : राकेश बोरा

गेल्या साडेतीन महिन्यांपासून ठप्प झालेल्या कांदा निर्यातीला आता थोडासा दिलासा मिळणार आहे. बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवाना  देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ २०० मे.टन कांद्याच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे.

भारतातील उत्पादनाचा विचार करता किमान पाच लाख मे.टन कांद्याची निर्यात होणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी संघटना तसेच निर्यातदारांनी व्यक्त केले आहे. ही बाब दिलासादायक असली तरी उत्पादक शेतकऱ्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकार सांगत आहे

बांगलादेश सरकारने 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांद्यावरील आयात बंदी हटवल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळनार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती अखेर या बांगलादेशातील कांदा आयात बंदी हटवल्यामुळे

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आज आणि उद्या दोनशे टनापर्यंत कांदा हा बांगलादेशात पाठवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे उद्या 15 ऑगस्ट ची सुट्टी असल्याने काही बाजार समिती शनिवारी आणि रविवारी बंद राहत असल्यामुळे खरे चित्र जे बाजार भाव वाढीचे हे सोमवारी स्पष्ट होणार आहे 

भारतातील एकूण कांदा निर्यातीपैकी ४०% हिस्सा बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशला पाठवण्यात आला होता, ज्यातून १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. बांगलादेशला प्रामुख्याने ‘दोन नंबर’ गुणवत्ता असलेला कांदा जातो.

Comments are closed.