मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता खाजगी कार्यालयातदेखील तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे आढळल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
नवीन आदेशानुसार खासगी कार्यालय व उपहारगृहांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास 200 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातही तंबाखूजन्य पदार्थ वापरास बंदी आहे. नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तंबाखूमुक्त परिसर करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय झाला आहे. जनसामान्याांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी “स्वच्छ भारत स्वस्थ भारत” मोहिमेद्वारे शासकीय इमारतींची साफसफाई करून शासकीय कायालये व परिसर हा “तंबाखू मुक्त परिसर” म्हणून जाहीर केला आहे.
इथे लागू राहणार नियम
सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कायालये, खाजगी कायालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होतो. तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरीता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायदा 2003 च्या कलम-4 अन्वये तंबाखू खाणे/थुांकणे/ धूम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धूम्रपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे.