NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

हे काय ? ‘या’ शहरात ईदगाह मैदानजवळ ‘लव्ह पाकिस्तान’चे फुगे !

0

सोलापूर/एनजीएन नेटवर्क

बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. याच दिवशी सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापुरात ईदगाह मैदानजवळ पाकिस्ताचा झेंडा आणि LOVE PAKISTAN लिहलेले फुगे विकले जात होते. बकरी ईद निमित्त नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाच्या लक्षात येताच फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे फुगे कुठून आणले यासंदर्भात चौकशी सुरु आहे. ईदच्या दिवशी पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवणारे फुगे विक्रीसाठी आणून काही जण समाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हे फुगे बाजारात कसे आले, कुणी तयार केले आणि होलसेल विक्री ज्यांनी केली या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएम वाहतुक आघाडीचे शहाराध्यक्ष रियाज सय्यद  यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येत असतात. यावेळी एक फुगेवाला लव्ह पाकिस्तान असे छापलेले फुगे विकत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. मुस्लीम बांधवांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देत त्या फुगेवाल्याला पकडून दिले. 

एमआयएमकडून कारवाईची मागणी

हा फुगेवाला अशिक्षित आहे. त्यामुळे त्याला कोणते फुगे विकत आहोत याची कल्पना नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिलीय, पण या फुगे विक्रेत्याला हे फुगे कोणी दिले, कोणत्या होलसेल विक्रेत्यांकडून त्याने हे फुगे विकत घेतले याची आता पोलीस चौकशी करत आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.