मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असतानाच या चित्रपटाने अमेरिकेत इतिहास रचला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने अमेरिकेत १०० हजार डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनानुसार या चित्रपटाने ८२ लाख १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने अमेरिकेत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कशी क्रेझ आहे, याबद्दल सांगितले आहे.
सध्या प्रत्येक घरात बाईपण भारी देवा चित्रपटाची गाणी, डायलॉग हिट ठरत आहेत. या चित्रपटाने परदेशातही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ५४ कोटींची कमाई केली आहे.