NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अनोखे स्नेहबंध जुळले… ( विशेष/स्नेह शिंपी )

0

** एनजीएन नेटवर्क

साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या इमारती समोर काम चालु होते. त्या इमारतीत बांधकाम करणारे कामगारही राहात असत. ही मंडळी बांधकामात मग्न असत मग त्यांच्या मुलांकडे साहजिकच दुर्लक्ष होत होते.. ती मुलं मग वयाने लहान असल्यामुळे आमच्या इमारतीच्या आवारात खेळायला येत असत. या मुलांना अभ्यासाची भारी हौस होती असं मला त्यांच्याशी बोलून जाणवले.

एकदा ओळखीच्या एका काकूंकडे कामानिमित्त जाणं झालं होतं. काकू घरात एकदम एकाकी व उदास होत्या.  गप्पांच्या ओघात मी सहज विचारले,  तेव्हा त्या म्हणाल्या, ‘ दिवसभर घरी एकटीच असते. त्यामुळे खूप कंटाळवाणे , एकाकी, अस्वस्थ वाटते ..  एकटेपणा मूळे घर खायला उठतं. खरं तर, काकांचा बिझनेस असल्याने ते दिवसभर घरी नसत. व रात्रीही ते घरी आल्यावर संगणकावर उशिरा पर्यंत आपले काम करत असतं . त्यांची दोन्ही मूले शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेली. त्यामुळे साहजिकच काकूंना एकटेपणा नकोसा झालेला. मी त्यांना मन रमेल असं काही करण्यास सूचवले. कामगारांच्या मूलांना शिकवण्याचा कानमंत्र दिला. काकूंना ही कल्पना आवडली व लगेच हो म्हणून मान डोलवली व मुलांना शिकवण्याचे मनावर घेतले.  दुसऱ्या दिवसा पासुनच काकू समोरच्या बिल्डिंगचे बांधकाम करणारया कामगारांच्या सात -आठ वयोगटातील मूलांना शिकवण्यास सुरूवात केली.  प्रथम मूलांना खाऊचे आमिष दाखवून शिकण्यासाठी तयार केले. शून्यापासून ते अक्षरांपर्यंत सुरूवात करताना काकूंना तारेवरची कसरत करावी लागली होती. पण काकूंची चिकाटी व धडपड्या वृत्तीने मूलेही अवघ्या काही महिन्यांतच वाचायला व लिहायला शिकली.  

विद्यादानासारखे श्रेष्ठ काम कूठलच नाही, हे काकूंना कळलं. काकूंच्या शिकवण्यामूळे ही मूले शिकून आज स्वावलंबी बनली. काकूंच्या प्रयत्नांना यश आले. हीच मुलं मोठी होवून चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत.  चांगल्या क्षेत्रात काम करून नाव लौकिक मिळवत आहेत. पण आजही ती मुलं काकूंना विसरली नाहीत. मनात विचार येई, कोण कुठली ही मुलं, पण केवळ काकूंच्या विना मोबदला शिकवण्याने ही मुलं आज स्वतच्या पायांवर उभी राहू शकली. , स्वावलंबी बनलींत. त्याचबरोबर शिक्षणामुळे चांगले- वाईट समजू शकली. म्हणूनच आजही काकुंशी त्यांचा स्नेहबंध टिकून आहे. कुठेही असली तरी दर गुरु पौर्णिमेला गुरू प्रति आदर व्यक्त करण्यासाठी व उत्तम आशिर्वाद घेण्यासाठी आवर्जून येतातच. काकूंनाही या मुलांचा अतोनात लळा व जिव्हाळा लागलेला आहे.  माझ्या मनातील विचारचक्र सुरू होतेच .. खरचं आपल्याकबे करण्यासारखे खूप काही असते. फक्त त्याचे योग्य वेळी महत्त्व जाणले पाहिजे.  काकूंनी त्या मुलांना आपलेसे करून जीवनाचा चांगलाच कानमंत्र दिला. त्यामुळे काकूंचे मनःपुर्वक आभार व कौतुकही वाटते. मला अगदी सहज सुचलं म्हणून काकूं जवळ बोलली. पण त्यामुळे काकूंचा वेळ अगदी मजेत गेला व आज ही मुलं मजूरी काम करण्यापासून बचावलींत. आपल्या जीवनात आपणच जीवनानंद शॅधला पाहिजे कारण जीवन हे खूप सुंदर आहे.  आपल्या एका सल्ल्याने कित्येकांच्या आयुष्यात कलाटणी मिळते हे महत्त्वाचे….
                     * स्नेहा शिंपी  

                          नाशिक

                     ९८५०९६३४९९

Leave A Reply

Your email address will not be published.