जळगाव : गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेत पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आरोपींना अटक करुन दिल्यामुळे त्यांच्या धाडसाचे देखील कौतुक होत आहे.
संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. संदीप पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमध्ये संदीप पाटील बालंबाल बचावले असून त्यांना बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानी आरोपींनी चारचाकी वाहन रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला बैल तसेच चार चाकी वाहन तसेच छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड या शस्त्रांसह असा मुद्देमाल जप्त केला आहे.