पुणे/एनजीएन नेटवर्क
पुण्यात दहशतवाद्यांचा स्फोट घडवण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका आरोपीला गोंदियातून अटक केलीय. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांना या दहशतवाद्याने गोंदियात राहण्यासाठी आसरा दिला होता, तर या प्रकरणातला आणखी एक मुख्य दहशतवादी शाहनवाजचा शोध सुरू आहे. कोंढवा पोलिसांच्या ताब्यातून पळालेला दहशतवादी शाहनवाज अल सफा या इसिसच्या धर्तीवर सुरू झालेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. केंद्रिय तपास यंत्रणा आणि एटीएस शाहनवाजच्या शोधात आहेत. आतापर्यंत या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आलीय. शाहनवाजची गर्लफ्रेंड अल्फिया आणि तिच्या वडिलांना एनआयएने अटक केली आहे. पुणे स्टेशन आणि बिहार आशा दोन ठिकाणी फरार दहशतवाद्याचे लोकेशन सापडले आहे. कोंढवामधल्या घरातून पळताना दहशतवाद्याने सोबत बंदुका घेतल्या आहेत.
महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद हे दोघे पुण्यात बॉम्बस्फोट घडवार असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनी मिळून सातारा पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे. 18 जुलै रोजी या दोन्ही दहशतवाद्यांना पुण्यातील कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाचे सगळे वरिष्ठ अधिकारी आज दाखल झालेले आहेत. हे दोघेही गोंदिया जिल्ह्यात असताना त्या ठिकाणी आणखी एका दहशतवादाने त्यांना आसरा दिला होता तसेच त्यांना आर्थिक मदत देखील केली होती. या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने गोंदियातून अटक केली आहे. त्याच्या संपर्कात इतर कोण होते याचा तपास एटीएस कडून सुरु आहे.