- प्रसंगावधान राखून पतीने काढला पळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पत्नीसोबतच्या प्रेमसंबंधातून पतीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांचा प्रयत्न फसल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील सातपूर परिसरात बुधवारी ( दि. १७ ) उघडकीस आला. संबंधित तरुणाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस ज्ञानदेव घाडगे (वय 24, रा. ध्रुवनगर, नाशिक) असे तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या तेजसचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला. मात्र, पत्नीचे विवाहापूर्वी गिरीश शिंगोटे या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. गिरीश हा सातत्याने तेजस याला धमक्या देत होता. बुधवारी दुपारी तेजस आपल्या मित्रास भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील एका चहा टपरीवर गेला असता, तेथे गिरीश शिंगोटेचा मित्र शैलेश ऊर्फ बंटी, अक्षय पवार व त्यांचे काही साथीदार स्विफ्ट डिजायर गाडी घेऊन आले. त्यांनी तेजसला टपरीबाहेर ओढून गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले. यावेळी मारहाण करत त्याचे अपहरण केले.
संशयितांनी गाडी सातपूर कॉलनीकडे नेताना तेजसला मारहाण करत त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला.प्रसंगावधान राखत तेजसने शिव हॉस्पिटलजवळून गाडीतून उडी घेतली आणि तातडीने एका रिक्षातून पपाया नर्सरी येथील ट्राफिक पोलिस चौकी गाठली. सातपूर पोलिसांनी गिरीश शिंगोटे, शैलेश कुवर उर्फ बंटी, अक्षय पवार व इतर अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकी यासंबंधी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
Comments are closed.