मुंबई/एनजीएन नेटवर्क
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाला म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस जारी केली आहे.