NGN News
Latest Marathi News

 बिगुल वाजला ! पाच राज्यांतील विधानसभा निवडणुक तारखा जाहीर

 नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व ठिकाणी निवडणुक निकाल ४ मे रोजी लागणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आलीय. 

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार असून, 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होईल. पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर तामिळनाडूत मतदान 23 एप्रिल रोजी होईल. याशिवाय, महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या मतदारसंघांमध्ये 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल 4 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सर्व राज्यांमध्ये सुरक्षित आणि पारदर्शक मतदान सुनिश्चित करण्यासाठी तयारी पूर्ण असल्याचे सांगितले आहे.

देशाच्या 5 राज्यातील मतदारांची संख्या एकूण 17.4 कोटी एवढी आहे, तर 824 एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 2.19 लाख असून एकूण कर्मचारी 25 लाख कार्यरत आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली. 

Comments are closed.