नाशिक पश्चिम आणि इगतपुरी या दोन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख अस्मिता देशमाने यांची शिवसेना महिला जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार देशमाने यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.
शिवसेनेत देशमाने यांच्यावर यांच्यावर सुरुवातीला महानगर प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांच्या कामाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर नाशिक पश्चिम आणि इगतपुरी या दोन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. अस्मिता देशमाने या सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या धडाडीच्या नेत्या आहेत. शिवसेनेत महानगर प्रमुख पदावर काम करत असल्याचा अनुभव देखील त्यांचा दांडगा आहे आणि पक्ष वाढीसाठी निश्चितच त्या कामाची मदत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना महानगरप्रमुख बंटी तिदमे, विलास शिंदे, अनिल ढिकले, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संगीता खोदाना, सुवर्ण मटाले, शामला दीक्षित, मंगला भास्कर, सोनाली पोटे, सुलोचना मोहिते, मंगल पाटील, शाहीन अन्सारी, संगीता पाटील, श्रद्धा कोतवाल, मनोरमा पाटील, ज्योती देवरे, गीता गुप्ता, आरती गायके, ज्योती फड, सुवर्ण जेतमल यांनी अस्मिता देशमाने यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
Comments are closed.