NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सीईटी परीक्षेत ‘अशोका’च्या ८ विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण ! 

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क  

एमएचटी (महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट) सीईटी २०२३  चा निकाल जाहीर होताच अशोका ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये अत्यंत हर्ष आणि उल्हासाचे वातावरण निर्माण झाले. अशोकाच्या तब्बल ८ विद्यार्थ्यांनी ९९ आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळवून शाळेचा मान वाढवला आहे. इतकेच नव्हे तर या परीक्षेस बसलेल्या अशोकाच्या एकूण ४५ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थ्यांनी ९० आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळवली आहे. 

ISC आणि HSC साठी असणारी सदर परीक्षा ही  ९ ते २० मे २०२३ दरम्यान पार पडली. ९९ आणि त्यापेक्षा जास्त टक्केवारी मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
१. स्वराज उपाध्याय – ९९.८७%
२. पलक चतुर्वेदी – ९९.७३%
३. इशान मेहता-  ९९.५५%
४. कृष्णा गोयल – ९९.४५%
५. इशिता मेहता – ९९.३३%
६. पर्णिका पवार – ९९.२१%
७. अश्विका बच्छाव – ९९.१९%
८. सुदीप ककलीज – ९९.०३%

एमएचटी सीईटी परीक्षेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे इंजिनीअरिंग आणि अप्लाइड सायन्सेस हा अभ्यासक्रम असणाऱ्या महाराष्ट्रातील आघाडीच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बारावी नंतर प्रवेश मिळण्यासाठी दरवाजे खुले होतात.  पालकांच्या आणि मार्गदर्शकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच विदयार्थीं अशी उत्कृष्ट कामगिरी करू शकले यात शंका नाही. 

अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यास नेहमीच  प्रोत्साहित करत असते. अशोका सर्वोत्कृष्ट ISC आणि HSC सयुंक्त अभ्यासक्रम प्रदान करतो जेथे विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमासह NEET, IIT-JEE आणि CA फाउंडेशनसाठी विशेष कोचिंग दिले जाते. संस्थेच्या प्राध्यापकांमध्ये एमडी डॉक्टर आणि आयआयटीयन्सचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्दर्शन करणे सहज शक्य होते. 

अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका रेणुका जोशी, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी, उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या बोराडे यांच्यासह अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल
अभिनंदन केले. अथक परिश्रमाने उत्तम टक्केवारी आणि शैक्षणिक यश मिळवल्याबद्दल  शाळेच्या शैक्षणिक प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.