NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट 

0

नाशिक : मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे.  जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, मोल्दोव्हा, युक्रेन आणि भारत. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे  भारतातील आघाडीचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समूहाचा भाग आहे. मेडिकव्हर रुग्णालये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरलेली आहेत आणि दरवर्षी लाखो रुग्णांवर या रुग्णालयातून उपचार करण्यात येतात. भारतातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्टरांचा सहभाग आमच्या समूहात आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहितीच्या आधारावर  व प्रोटोकॉल नुसार आम्ही कार्य करत आहोत.

आरोग्यसेवा करत असताना सामाजिक जाणीव ठेऊन मेडिकव्हर समूह समाजातील घटकासाठी नेहमी आपले दायित्व जपत आले आहे,याच अनुषंगाने  सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी शिर्डी शहरातील  रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने  ट्रॅफिक  बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक २३ जानेवारी  २०२३ रोजी दुपारी २ :०० वाजता पोलीस मुख्यालय , शिर्डी  येथे करण्यात आले होते . हा  सोहळा  माननीय श्री रामकृष्ण कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला , या प्रसंगी उपस्थित समूहास संबोधित करताना ते म्हणाले कि, ट्रॅफिक  बॅरिगेट्स मुळे शिर्डी शहरात वाहतुकीचे  नियोजन करत असताना, वाहतूक  सुरक्षित आणि सुरळीत होण्यास निश्चितच मदत  होणार आहे.  या हस्तांतर सोहळ्यास  केंद्र प्रमुख सौरभ नागर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर , सहा.  पोलीस निरीक्षक सागर काळे ,सहा. पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहा.पोलीस निरीक्षक संभाजी पाटील व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर , पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.