नाशिक/एनजीएन नेटवर्क
रस्ते आणि पूल निर्माण क्षेत्रांत सार्वत्रिक लौकिक राखून राहिलेल्या येथील अशोका बिल्डकॉन लिमिटेडची राष्ट्रीय स्तरावर आणखी एक किर्तीध्वजा फडकली आहे. कंपनीला नुकताच सर्वाधिक प्रशंसनीय बांधकाम समूहाचा (Most Admired Construction Company ) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२१ व्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड ग्लोबल अवार्ड्स’ सोहळ्याप्रसंगी इंडियन आर्म्ड फोर्सेसचे इंजिनिअर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांच्या हस्ते अशोका बिल्डकॉनचे संचालक आशिष कटारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उच्च गुणवत्ता, पारदर्शकता आणि निर्धारित वेळेपूर्वी प्रकल्प निर्माण करण्याची अद्वितीय वैशिष्ट्ये ही अशोका बिल्डकॉन लिमिटेडची बलस्थाने मानण्यात येतात.