नाशिक/एनजीएन नेटवर्क
रस्ते आणि पूल बांधणी क्षेत्रांत देशभर ख्याती असलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेडने वडोदरास्थित एक्सप्रेसवर उभारलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी चौथा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावला आहे. सदर पुरस्काराचे वितरण नुकतेच एका शानदार सोहळ्यात करण्यात आले.
‘अशोका’ने या एक्सप्रेसवर आठ मार्गिका असलेला अतिरिक्त पूल विक्रमी काळात उभारून आपल्या लौकिकात भर टाकली आहे. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग यशस्वी झाला आहे, ज्याची दखल राष्ट्रीय स्तरावर याआधी तीन वेळा घेण्यात आली आहे. १० व्या ईपीसी वर्ल्ड पुरस्कार सोहळ्यात ‘अशोका’ला ‘रस्ते आणि महामार्ग निर्माणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदाना’बद्दल ( Outstanding contribution to roads and highways) सन्मानित करण्यात आले. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘अशोका’चे संचालक आशिष कटारिया आणि महाव्यवस्थापक रवींद्र विजयवर्गीय यांनी पुरस्कार स्वीकारला. कंपनीने आजवर देश-विदेशांत अनेक बडे प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्णत्वास नेवून वेगळ्या विक्रमांची नोंद केली आहे.