भगूर/दीपक कणसे
नानेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अशोक आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नंदा काळे यांनी राजीनामा दिल्याने नव्याने सरपंच पदाची निवड करण्यात आली. नानेगाव सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात होते.
आज सकाळी अकरा वाजता मारूती मंदिरात ग्रामस्थांसह सर्व अकरा ग्रामपंचायत सदस्य शासकीय अधिकारी सोबत हजर होते. यावेळी दोन्ही राजकीय गटांकडून एकत्रित येऊन गावाचा विकास करू असे म्हणत दोन्ही नावांची घोषणा केली.ज्ञानेश्वर शिंदे व अशोक आडके या दोघांच्या नावाने चिठ्ठी टाकण्यात आली. यावेळी चिठ्ठी पध्दतीने अशोक आडके यांना नवनिर्वाचित सरपंच म्हणून घोषित करून पुढील वर्षी आडके यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्ञानेश्वर शिंदे यांना सरपंच करण्यात येण्याचे ठरले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य नंदा काळे, उपसरपंच विमल आडके,काळू आडके, अनिता आडके, आशा मोरे,वासुदेव पोरजे,संपत बड्रे,वर्षा आडके, भारती शिंदे यासह सुनिल आडके, विलास आडके, प्रमोद आडके पोलीस पाटील संदिप रोकडे,ग्रामसेवक उत्तम शेटे, प्रमोद आडके,नवनाथ शिंदे, मोहन आडके,योगेश आडके, ज्ञानेश्वर काळे,संदीप काळे,रामदास शिंदे,पंडीत रोकडे,राजाराम शिंदे,भानुदास शिंदे,ज्ञानेश्वर चौधरी,जगन शिंदे,निव्रुत्ती काळे आदि उपस्थित होते.