नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात लहान शिशु ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले.
शाळेच्या मैदानात पालखी आणि दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये रिंगण खेळण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी फुगड्या खेळून विठूनामाचा गजर केला. यामुळे शाळा परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले होते. शालेल्चे संचालक केन केंद्रे यांच्या हस्ते विठूरायाची आरती करण्यात आली. मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना एकादशीचे महत्व आणि तदनुषंगिक माहिती विषद केली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.