नाशिक/एनजीएन नेटवर्क
तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागणे अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. कारण दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विरोधात आलेल्या अर्जानुसार चौकशी होवून गुन्हा न नोंदवण्याच्या मोबदल्यात अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे आणि पोलीस शिपाई कुमार गोविंद जाधव यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात येवून दोहोंना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.