नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथे शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा दिन विद्यालयाचे संस्थापक डॉ. ऑगस्टीन पिंटो, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाद्वारे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा दिनाचा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर बायबल मधील पवित्र वचन पठण झाले. इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर प्रार्थना गीते सादर केली.
या क्रीडा दिनाला मान्यवर अतिथी म्हणून साहिल शिंगणे, सोनल जोशी,तानाजी कांडेकर,पास्टर जेम्स मोजेस, सचिन बेडीस पालक प्रतिनिधी रोहित मंगळवेढेकर बुशरा शेख उपस्थित होते मान्यवर अतिथींनी ध्वजारोहण करून क्रीडा दिनाची सुरुवात करून दिली. या वार्षिक क्रीडा दिनात पोटॅटो रेस , काऊ रेस , कॉइन रेस इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश होता या सर्व क्रीडा प्रकारात चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर अतिथीच्या हस्ते प्रमाणपत्र व पदके देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवर अतिथिनी विद्यार्थ्यांना एखाद्या तरी खेळाची जोपासना व खिलाडू वृत्ती जोपासावी असा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख शितल चिंचोलीकर, माध्यमिक विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका लता खैरनार व दिनेश जॉन व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.